मुंबई

फॅक्ट-चेकिंग युनिटमुळे कोणतीही गंभीर हानी नाही

CD

- अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सरकारच्या विरोधात सोशल मीडियावरील बनावट आणि खोटे मजकूर ओळखण्यासाठी सुधारित माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांतर्गत तथ्य तपासणी युनिट (एफसीयू) स्थापन करण्यावर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ११) नकार दिला. फॅक्ट-चेकिंग युनिट स्थापन केल्यास कोणतीही गंभीर हानी होणार नाही, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.
माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सरकारने केलेल्या दुरुस्तीला हास्यकलाकार कुणाल कामरा याच्यासह एडिटर गिल्ड ऑफ इंडिया, द असोसिएशन ऑफ इंडियन मॅगझीन आणि न्यूज ब्रॉडकास्ट व डिजिटल असोसिएशन या संघटनांनी आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी सुधारित नियमांना विरोध दर्शवत सुधारित नियमांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यापासून सरकारला रोखावे, तसे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या प्रकरणावर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गेल्या महिन्यात न्या. गौतम पटेल आणि न्या. निला गोखले यांच्या खंडपीठाने भिन्न मत नोंदवली होती. त्यामुळे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी ते प्रकरण न्या. अतुल चांदूरकर यांच्याकडे सुनावणीसाठी पाठवले. या प्रकरणी न्यायालयाने फॅक्ट-चेकिंग युनिट स्थापन केल्यास कोणतीही गंभीर हानी होणार नाही, असे स्पष्ट करत एफसीयू स्थापन करण्यावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

SCROLL FOR NEXT