Navi Mumbai News sakal
मुंबई

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या पोलिसांची मोठी कारवाई; आठ हजार ८२८ वाहनचालकांना दिला दणका

वाहतूक पोलिसांनी २७ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.

CD

Navi Mumbai : नवी मुंबई वाहतूक विभागाने फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा असलेल्या वाहनांविरोधात तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवून तब्बल आठ हजार ८२८ वाहनचालकांवर कारवाई केली.

वाहतूक पोलिसांनी २७ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.

वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे व त्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी विशेष मोहीम राबविण्याबाबतचे आदेश सर्व युनिटच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांमार्फत २७ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ हजार ८२८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

या वाहतूकचालकांवर कारवाई


१. वाहनांना काळ्या काचा लावणारे - २५६
२. फॅन्सी नंबरप्लेट अथवा अस्पष्ट नंबरप्लेट - ४८१
३. विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे - ८,०९१

या कारवाईत वाहनचालकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारची कारवाई यापुढील काळात नियमित सुरू राहणार असून वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, वाहतूक सरक्षित व सुरळीत ठेवण्यास वाहतूक विभागास सहकार्य करावे.


- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT