Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime News: बांधकाम व्यवसायिकाला ६० लाखांना गंडा

सायबर चोरट्याने त्याच दिवशी दुपारी नितीला व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे संपर्क साधला. तसेच तो कंपनीचा मालक | The cyber thief contacted Niti through WhatsApp chatting on the same day afternoon. He is also the owner of the company

CD

Navi Mumbai Crime News: सायबर चोरट्याने वाशीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या दोन बँक खात्यातील ६० लाखांची रक्कम हडप केली. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह अपहार तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे कार्यालय वाशी सेक्टर-१९ मध्ये असून ६ मार्च रोजी सकाळी एका सायबर चोरट्याने या व्यावसायिकाच्या कार्यालयात फोन केला होता. तसेच त्याने कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून कंपनीतील अकाऊंटचे काम पाहणाऱ्या नितीन याचा मोबाईल नंबर घेतला.

या वेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांनीदेखील कार्यालयाचे काम असल्याचे समजून सायबर चोरट्याला नितीनचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर सायबर चोरट्याने त्याच दिवशी दुपारी नितीला व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे संपर्क साधला. तसेच तो कंपनीचा मालक असल्याचे सांगितले.

माल खरेदी करण्याचा बहाणा


सायबर चोरट्याने माल खरेदी करण्याच्या बहाण्याने आपल्या कंपनीच्या खात्यातून ४५ लाख ६० हजार रुपये एका बँक खात्यावर पाठवण्यास सांगून त्याला खाते क्रमांक दिला. या वेळी नितीननेदेखील आरटीजीएसद्वारे रक्कम पाठवून दिली. काही वेळानंतर सायबर चोरट्याने व्हॉट्सॲपद्वारे पुन्हा नितीनला संपर्क साधून दुसरा खाते क्रमांक देऊन त्यावर १५ लाख रुपये पाठवण्यास सांगितले.

ती रक्कमसुद्धा नितीनने कंपनीच्या खात्यातून पाठवून दिली. दरम्यान, सायंकाळी कंपनी मालक घरी जाण्यास निघाले असता, त्यांनी दिवसभरात झालेल्या कामाचा तपशील घेतला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या व्यावसायिकाने नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT