Crime News sakal
मुंबई

Crime News: दोन हजारांची लाच भोवली; पोलिस उपनिरीक्षकाला अटक

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप |Allegation that the officer demanded bribe for not taking action in case of violation of rules

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: लाचलुचत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई पथकाने वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.

फ्रान्सिस रेगो असे आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तो सहार वाहतूक विभागात तैनात आहे. वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराकडे दोन चारचाकी वाहने असून ती वाहने एका खासगी कंपनीत कामासाठी वापरण्यात येतात. गुरुवारी चालकाने अंधेरी परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी वाहन जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांना वाहनावर १७००० रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे आढळले.

यानंतर वाहनचालकाकडे कारवाई न करण्यासाठी आरोपी वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाने २००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, वाहनचालकाने तक्रारदाराला संपर्क साधून घटनेबद्दल सांगितले. वाहन सोडण्यासाठी २००० रुपयांची लाच मागितली जात असल्याची माहिती तक्रारदाराला मिळाली.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. तसेच त्याच दिवशी लेखी तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदाराने केलेल्या आरोपांच्या पडताळणीत उपनिरीक्षक फ्रान्सिसने लाच मागितल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळून आले.

त्यानुसार सापळा रचून आरोपी उपनिरीक्षक रेगो याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रेगो यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: धावत्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला, १४ जणांचा मृत्यू

Mumbai Goa highway toll news : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नाही, पालकमंत्री राणेंचा विश्वास; सिंधुदुर्गवासीयांना दिलासा

MS Dhoni: घरच्या मैदानावर तरी थालाचं दर्शन होणार? गुजराविरूद्धच्या सामन्यापूर्वी CSK चे कोच काय म्हणाले?

IPL 2026, DC vs PBKS: '... तर आम्ही हरायला पाहिजे', २६४ धावा करूनही पराभव झाल्यानंतर अक्षर पटेल संघावर संतापला

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

SCROLL FOR NEXT