mumbai local mega block  sakal
मुंबई

Mumbai Local News: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल

मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News| लग्न सभारंभ आणि होळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे मेगाब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले आहेत. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येत होती.

परिणामी, या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. ठाणे, डोंबिवली, कल्याण, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते वाशीदरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कुर्ला ते वाशीदरम्यानच्या प्रवाशांना रस्तेमार्गाने प्रवास करावा लागला. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविल्या होत्या; परंतु या लोकलची संख्या कमी होती. त्यामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांची गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT