Mumbai Local batmat Squad News  sakal
मुंबई

Mumbai Local News: लोकलमधील फुकट्यांवर 'बॅटमॅन'चा वॉच; आतापर्यंत तब्बल इतक्या हजार प्रवाशांवर केली कारवाई

रात्री आठ वाजल्यानंतर लोकल स्थानकावर तिकीट तपासणी जवळपास बंद असते | After 8 pm the ticket checking at the local station is almost closed

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या बॅटमॅन पथकाने गेल्या चार दिवसांत चार हजारांपेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत दहा लाखांपेक्षा जास्त महसूल गोळा केला आहे. (Mumbai Local News)

रात्री विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने बॅटमॅन (बी अवेअर टीटीई मॅनिंग अॅट नाइट) या पथकाची स्थापना केली असून हे पथक रात्रीच्या वेळेस तिकीट तपासणी करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहे.(mumbai local)


लोकलमधून रात्री अनेक प्रवासी बिनधास्तपणे विनातिकीट प्रवास करत असल्याचा तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे, रात्री आठ वाजल्यानंतर लोकल स्थानकावर तिकीट तपासणी जवळपास बंद असते. (mumbai local batman)

त्यामुळे रात्रीच्या वेळी फुकट्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे रात्री लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने बॅटमॅन या पथकाची स्थापना केली असून हे पथक रात्रीच्या वेळेस फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहे.

‘बॅटमॅन’ पथकाने आपले मिशन सोमवारी रात्रीपासून सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांत तीन हजार ६७९ हून अधिक तिकीट नसलेल्या प्रवाशांना पकडले आहे. या फुकट्या प्रवाशांकडून पथकाने दहा लाखांपेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केला. (mumbai local batman squad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे होणार “आर्थिक ऑडिट”... आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

Cough Syrup Warning : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप, बालकांच्या मृत्यूनंतर सूचना; सर्दी, खोकल्‍याची औषधे बालकांना देऊ नका

SCROLL FOR NEXT