Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबईत वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याऱ्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या; दोघांचा शोध सुरु

Mumbai Crime: वसई-विरार पोलिसांच्या भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने या दलालाला अटक केली आहे | Vasai-Virar police's anti-immoral traffic cell at Bhayandar has arrested the broker

CD

Mumbai Crime News: मिरा-भाईंदरसह, ठाणे, मुंबई येथे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याचे काम एका बांगलादेशी दलालाकडून केले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने या दलालाला अटक केली आहे. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

मुंबईतील अंधेरी येथील चार बंगला परिसरात वास्तव्यास असलेला सुलतान ऊर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल व त्याचे दोन साथीदार हे वेश्या व्यवसायातील दलाल आहेत. गिऱ्हाईकांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला की मुंबई, ठाणे, काशी-मिरा व मिरा-भाईंदर या परिसरातील लॉजमध्ये अनैतिक कामासाठी मुली पुरवतात व मोबदला, त्यांचे कमिशन असे एकूण १५ हजार रुपये घेतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर निरीक्षक समीर अहिरराव यांनी सहकाऱ्यांसह बोगस गिहाईकाच्या माध्यमातून दलालाशी संपर्क साधला. व्यवहार ठरल्यानंतर काशी-मिरा परिसरातील लॉजमध्ये सापळा रचण्यात आला. या वेळी संशयित आरोपी सुलतान ऊर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल याला रक्कम घेताना पकडण्यात आले.

चौकशीत आरोपीने तो पारपत्र व व्हिसाशिवाय भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून अंधेरी परिसरात चार महिन्यांपासून वास्तव्य करत असल्याचे कबूल केले. या वेळी अनैतिक व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, तसेच परकीय नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT