Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: अपघाताचा बनाव करत लुटली १२ लाखांची रोकड; वाचा संपुर्ण प्रकरण

कार जुईनगर येथे अडवून कारमधील १२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली |

CD

Navi Mumbai News: अज्ञात चौकडीने अपघाताचा बनाव करून एका व्यावसायिकाची कार जुईनगर येथे अडवून कारमधील १२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली. (navi mumbai News)

नेरूळ पोलिसांनी या चौकडीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. खारघर येथे राहणारा ग्रीमसन नाडर (वय ३३) हा व्यावसायिक खारघरमध्ये राहण्यास असून तो गेल्या शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केट येथून १२ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कारने खारघर येथे जात होता.(mumbai news)

यावेळी त्याची कार सायन-पनवेल मार्गावरील जुईनगर येथील स्कायवॉकजवळ आली असताना, अज्ञात चौकडीने त्यांच्या कारला पाठीमागून धडक देऊन अपघात झाल्याचा बनाव रचून त्याची दिशाभूल केली. त्यानंतर आरोपीने नाडर यांच्यासोबत वाद घालून भांडण काढले.

याचवेळी आरोपींमधील एकाने त्याच्या कारची काच फोडून सदर रोख रक्कम असलेली बॅग चोरून पळ काढला. काही वेळानंतर नाडर याला हा प्रकार निदर्शनास आला. मात्र, त्यानंतर त्याने आपले घर गाठले. त्यानंतर त्याने मंगळवारी नेरूळ पोलिस ठाणे गाठत हा घटनेची तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT