श्रीगुरू पादुका दर्शन sakal  sakal
मुंबई

Paduka Darshan 2024: ‘श्रीगुरू पादुका दर्शन' सोहळ्यात तब्बल इतके वारकरी होणार सहभागी

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे |Maharashtra State Warkari Corporation is appealing to all

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: ‘सकाळ’ समूहातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘श्रीगुरू पादुका दर्शन’ उत्सव सोहळ्यामुळे नवी मुंबई पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याला नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

रायगड ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. स्वराज्याची राजधानी आहे. नवी मुंबईत ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘न भूतो न भविष्यती’ असा दिव्य सोहळा होत आहे. या सोहळ्यात येणाऱ्या संतांच्या आणि गुरूंच्या पादुका रायगड जिल्ह्यातून जाणार आहेत.

१८ संतांच्या पादुकांचे एकाच छताखाली एकत्र दर्शन घेता येणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य वारकऱ्यांना मिळणार आहे. त्याकरिता कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार, प्रसार करीत आहेत. हरिपाठ मंडळांसोबत संपर्क सुरू आहे. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे, की या सर्व भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेऊन जीवन कृतार्थ करावे.


- पुंडलिक महाराज, रायगड अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

मुंबई, ठाणे, रायगडसहित महाराष्ट्रातील समस्त भाविक भक्तांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘श्रीगुरू पादुका दर्शन’ सोहळा एक आध्यात्मिक उपक्रम आयोजित केल्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईसारख्या मायानगरीमध्ये भक्ती-प्रेमाचा झरा वाहण्याचे अद्वितीय सेवाकार्य संपन्न होणार आहे.

मुंबईतील नागरिकांच्या धकाधकीच्या आयुष्यात अध्यात्मातून परमार्थ मिळण्याचा पर्याय ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध केला आहे. एका छताखाली १८ संतांच्या पादुकांचे दर्शन ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. आम्ही समस्त वारकरी संप्रदाय मुंबईसहित महाराष्ट्र राज्याच्या वतीने अंतःकरणापासून ‘सकाळ माध्यम समूहा’चे शतशः आभार व्यक्त करीत आहोत. या अद्वितीय भक्ती पर्वणीचा लाभ सर्व मुंबईकरांनी घ्यावा, असे आवाहन करीत आहोत.

कर्जत परिसरातील ख्यातनाम ज्येष्ठ कीर्तनकार द्वारकानाथ महाराज देशमुख यांनीही या सोहळ्याला तालुक्यातील सर्व वारकरी आणि भजनी मंडळ सहभागी होण्याचे आश्वासन दिले. साखरे महाराज परंपरेतील ह.भ.प. आनंद महाराज खंडागळे यांनी या कार्यक्रमाला भरभरून आशीर्वाद दिले. तसेच या आयोजनाकरिता ‘सकाळ समूहा’चे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. तसेच या भव्य सोहळ्याचा सर्व वारकऱ्यांनी दर्शन घेण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT