मुंबई

Mumbai Police: 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन विक्री करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी १२ तासात घेतला शोध

पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला भांडुप पोलिसांना १२ तासांत अटक करण्यात यश आले आहे |Bhandup police have managed to arrest a gang of women who kidnapped a five-year-old girl and tried to sell her within 12 hours.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला भांडुप पोलिसांना १२ तासांत अटक करण्यात यश आले आहे.

खुशबू गुप्ता, मैना दिलोड, दिव्या सिंह आणि पायल सिंग अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. या टोळीने अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

भांडुप परिसरात राहणारी पीडित मुलगी रविवारी रात्री परिसरातील एका दुकानात फुगे विकत घेण्यासाठी गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.

त्यादरम्यान परिसरातील एका महिलेसह मुलगी रिक्षातून गेल्याची माहिती एका स्थानिक महिलेने मुलीच्या आई-वडिलांना दिली. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
----

मुलीला केले पालकांच्या स्वाधीन


तपासात परिसरातील आरोपी महिला खुशबू गुप्ता हिने मैना दिलोड हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी ठाणे परिसरात राहणाऱ्या दिव्या सिंह आणि पायल सिंग यांच्याकडे मुलीची विक्री केल्याचे सांगितले.

पोलिसांनी तत्काळ त्या दोघींचा शोध घेत ठाणे परिसरातून ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT