Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: परीक्षेत प्रश्‍नांची उत्तरे न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी केला चाकूहल्ला

Bhivandi Crime: आसिफ साजिद शेख (वय १६) याला सह परीक्षार्थींनी प्रश्‍नांची उत्तरे विचारली, परंतु आसिफने उत्तरे दाखवण्यास नकार दिला | Asif Sajid Shaikh (age 16) was asked questions by fellow examinees, but Asif refused to show the answers.

CD

Bhivandi Crime: परीक्षेत प्रश्‍नांची उत्तरे न सांगितल्यामुळे विद्यार्थ्यास तीन विद्यार्थ्यांनीच चाकूने मारहाण केल्याची घटना शहरातील शांतीनगर हद्दीत मंगळवारी (ता. २६) घडली.

याप्रकरणी दहावीची परीक्षा देणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील शांतीनगर हद्दीतील साफिया शाळेत २६ मार्च रोजी दहावीची परीक्षा सुरू असताना आसिफ साजिद शेख (वय १६) याला सह परीक्षार्थींनी प्रश्‍नांची उत्तरे विचारली, परंतु आसिफने उत्तरे दाखवण्यास नकार दिला.

त्यामुळे रागावलेल्या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर आसिफला मारहाण केली. तसेच चाकूने वार करत त्याला जखमी केले. या झटापटीत आसिफचा मोबाईलही गहाळ झाला. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परीक्षेला जाण्यापूर्वी मुलांची कसून तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT