मुंबई

Thane Politics: आनंद परांजपे आणि नजीब मुल्लांना महायुतीत महत्व नाही; शरद पवार गटाच्या नेत्याची टिका

आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत|They are trying to show their existence

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २७ : महायुतीमध्ये आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांना महत्त्व नाही. त्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद्‍चंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केली

. विकसकांच्या योजना अडवून महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो, असा प्रश्‍न उपस्थित करत देसाई यांनी परांजपे आणि मुल्ला यांच्याबाबत संशय व्यक्त केला.

आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्याला सुहास देसाई यांनी आज प्रत्युत्तर दिले. आनंद परांजपे यांना महायुतीतच नाही, तर त्यांच्या पक्षातही महत्त्व नाही. त्यामुळेच ते आव्हाड यांच्यावर टीका करत आहेत.

आव्हाड दोनदा मंत्री होते, पण त्यांनी कधी कोणाकडून पैसे घेतले नाहीत, पण पालिकेतील चौथ्या मजल्यावर विकसकाच्या योजना अडवून किती पैसे उकळले जातात हे ठाण्याला माहीत आहे, असे देसाई म्हणाले. वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुल्ला यांचे दाऊदशी संबंध आहेत असे सांगितले होते.

शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला याला कुणी दिली होती, नजीब मुल्ला कारभार पाहत असलेल्या मर्कन्टाईल बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप एका व्यक्तीने केला, त्याची चौकशी कशी थांबली, अशा प्रश्‍नांची सरबत्ती देसाई यांनी केली.

आनंद परांजपे यांनी आव्हाड यांचा कपटी मित्र अशा केलेल्या उल्लेखावर देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. परांजपे आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झाला तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनीच त्यांचे रुग्णालयाचे बिल भरले, अशी आठवण त्यांनी करून दिली. तसेच परांजपे यांनी पक्षाशी केलेल्या दग्यामुळे त्यांच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीकाही देसाई यांनी केली.(Anand Paranjape and Najeeb Mulla are not important in the Grand Alliance


)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT