मुंबई

पायाभूत क्षेत्रातील वाढ मंदावली

CD

नवी दिल्ली, ता. २८ (पीटीआय) ः महत्त्वाच्या आठ पायाभूत क्षेत्रांची वाढ फेब्रुवारी महिन्यात ६.७ टक्के मंदावल्याचे समोर आले आहे. खतनिर्मितीसारख्या काही क्षेत्रांतील खराब कामगिरीमुळे पायाभूत क्षेत्राच्या वाढीवर परिणाम झाल्याचे गुरुवारी (ता. २८) जाहीर झालेल्या आकडेवारीतून निष्पन्न झाले आहे. जानेवारी महिन्यापेक्षा ही वाढ जास्त असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोळसा, क्रूड ऑईल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या मूलभूत क्षेत्रातील जानेवारी महिन्यात झालेली वाढ ही ४.१ टक्के इतकी होती. तीच फेब्रुवारी महिन्यात ७.४ टक्के नोंदवली गेली. एकत्रितपणे, या क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढीचा दर एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ मधील ८.२ टक्क्यांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारीमध्ये ७.७ टक्क्यांवर घसरला. खताची उत्पादन वाढ नकारात्मक नोंदवली गेली. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात आठ प्रमुख क्षेत्रांचा वाटा ४०.२७ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs CSK Live IPL 2024 : शुभमन पाठोपाठ साईचं शतक; अखेर सीएसकेच्या तुषार देशपांडेने जोडी फोडली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT