Traffic News
Traffic News sakal
मुंबई

Traffic News: वाहतुक समस्या आम्ही सोडवायच्या का?; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कसारा घाटात विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात असून या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. (Bombay High Court)

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत लोक विरुद्ध दिशेने प्रवास करतात त्याला कोर्ट काय करणार? आम्ही वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी येथे बसलो आहोत का, असा सवाल करून खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. (What will the court do?)

इतकेच नव्हे तर संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागा, असे न्यायालयाने बजावत याचिका निकाली काढली.

मुंबई येथून कसारा घाटमार्गे नाशिक येथे जाणाऱ्या महामार्गावर काही प्रवासी विरुद्ध दिशेने वाहनाद्वारे प्रवास करतात. त्यामुळे अपघाताचा धोका असून पर्यायी मार्गांची दयनीय अवस्था झाल्यामुळेच लोक राष्ट्रीय महामार्ग १६० वरून विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याचा दावा करून मंजुळा बिस्वास यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या ठिकाणी नियमित वाहतूक पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात यावे आणि संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या जनहित याचिकेवर आज (ता. २८) मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

त्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आणि खडे बोल सुनावले. लोकच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत असतील तर आम्ही तरी काय करणार? आम्ही येथे वाहतुकीचे प्रश्‍न सोडवण्यासाठी बसलो आहोत का, अशा शब्दांत खंडपीठाने जाब विचारला.

संबंधित प्राधिकरणाकडे याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी दाद मागावी, प्राधिकरणाने त्याची दखल घ्यावी, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.


रस्तेकामाबाबत अहवाल सादर


दरम्यान, पर्यायी मार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज रस्त्याच्या कामाबाबत प्रगती अहवाल सादर केला, त्याची दखल घेत न्यायालयाने याप्रकरणी दाखल केलेली अन्य याचिकाही निकाली काढली.(A petition was filed)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT