mega block in mumbai sakal
मुंबई

Mumbai Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण बातमी

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे |A block will be taken on Western Railway from Mumbai Central to Churchgate up and down fast track

सकाळ वृत्तसेवा


Mumbai Mega Block: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३१) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक आहे; तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्व -
कुठे - माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम-
सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा ब्लॉकदरम्यान माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर धावतील; तर ठाणे येथून अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याने मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. त्यामुळे नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गाड्या धावतील.

हार्बर रेल्वे
कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम -
ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर / नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान बंदर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत

पश्चिम रेल्वे
कुठे - चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर
वेळ - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम -
या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT