Crime News sakal
मुंबई

Crime News: अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या तरुणाला अटक

उरण पोलिसांनी पीडित मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे | Uran police have registered a case against the young man who married the victim girl and arrested him

CD

Navi Mumbai News: उरण भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीशी मंदिरात विवाह केला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे उघड झाले आहे. (Uran Crime)

पीडित मुलीने रुग्णालयात मुलीला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनी याबाबतची माहिती उरण पोलिसांना दिली. त्यानंतर उरण पोलिसांनी पीडित मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेतील १५ वर्षीय पीडित मुलगी व तिच्याशी विवाह करणारा २१ वर्षीय तरुण हे दोघेही उरण परिसरात एकाच भागात राहण्यास आहेत.(Uran)

वर्षभरापूर्वी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते; मात्र दोघांचेही वय कमी असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध केला होता.(A love affair had developed between the two)

मात्र त्यानंतरदेखील त्या दोघांनी आपल्या कुटुंबियांचा विरोध डावलून मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. तिला प्रसववेदना होत असल्यामुळे ती चार दिवसांपूर्वी रुग्णालयात गेली होती. या वेळी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी उरण पोलिसांना याबाबतची माहिती दिली(The victim is pregnant)

. उरण पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT