मुंबई

अजय लालवानी यांना सूवर्ण पदक

CD

अजय लालवानी यांना सुवर्णपदक
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर अंध अजय लालवानी यांनी ग्वालियर, मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि रजत पदक मिळवले. २९ ते ३१ मार्चदरम्यान ही स्पर्धा पार पडली. यामध्ये २० राज्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. अंध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. पॅरालिंपिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मध्य प्रदेश व पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने अटल बिहारी वाजपेयी ट्रेनिंग सेंटर ग्वालियर येथे ही स्‍पर्धा पार पडली. ५० मीटर पोहण्याच्या स्‍पर्धेत त्यांनी प्रथम आणि द्वितीय अशी दोन पदके जिंकली. ५० मीटरचे अंतर त्‍यांनी ४७ सेकंदांत पूर्ण करत प्रथम क्रमांक, तर दुसऱ्या स्‍पर्धेत ५० मीटर अंतर त्‍यांनी ५९ सेकंदांत पूर्ण करत द्वितीय क्रमांक मिळवला. घन कचरा व्यवस्थापनाचे प्रमुख अभियंता इरफान काझी यांनी अजय यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

Char Dham Yatra: फक्त २ दिवसांत पूर्ण होणार चारधाम यात्रा? हवाई सेवेने दर्शन झाले सुपरफास्ट पण.. शंकराचार्यांनी दिला खास सल्ला

SCROLL FOR NEXT