मुंबई

अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

CD

बोळिंज, ता. २ (बातमीदार) : कुत्र्याला मारहाण केल्याबद्दल जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलाला जमावाने मारहाण केल्याची घटना विरार पूर्वेला चंदनसार परिसरात सोमवारी (ता. १) घडली. कौस्तुभ जाधव (वय १७) असे मुलाचे नाव असून त्याला मोठी दुखापत झाली आहे. विरार पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार पूर्वेला चंदनसार परिसरातील पेट्रोल पम्पावरील कर्मचारी एका कुत्र्याला गोणीत भरून मारहाण करत होते. त्या वेळी कौस्तुभ जाधव या मुलाने त्यांना याचा जाब विचारला. तसेच मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जमावाने कौस्तुभला मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडनेही त्याच्यावर हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पेट्रोल पम्पावर याआधीही अशा मारहाणीच्या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT