मुंबई

कळव्यात रंगणार पालखी नृत्यस्पर्धा

CD

कळवा, ता. ४ (बातमीदार) : गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण होय. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून गावी जात असतात; मात्र ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ७) दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदानात हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे. या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले आहे. रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांतील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या पालखी संघाला दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्याला एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी संघांना प्रत्येकी २५ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT