मुंबई

वेदश्री ठरली गावातील पहिली महिला डॉक्टर

CD

दिवा, ता. ४ (बातमीदार) : दिवा शहरालगतच्या फडकेपाडा गावातील रिक्षाचालकाची मुलगी डॉक्टर झाली आहे. वेदश्री यशवंत पाटील हिचे वडील रिक्षाचालक आहेत. ते दिवा ते शिळफाटा मार्गांवर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. वेदश्रीने बीएचएमएस पदवी प्राप्त केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे वेदश्री ही फडके पाडा गावातील पहिलीच महिला डॉक्टर आहे. त्यामुळे खूपच आनंद होत असल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले.

फडकेपाडा गावातील ग्रामस्थांनी चौका-चौकात शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या वेदश्रीने डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगले होते. पहिली ते चौथी ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ८४ मध्ये तिचे शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवी ठाणे महापालिका शाळा क्र. ८१ व पुढील शिक्षण शिळगांवमधील हाशा रामा पाटील माध्यमिक विद्यालय, तर बी. एन बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्समध्ये पदवी शिक्षण घेतले; तर नाशिकमधील श्रीमती कांचनबाई बाबुलालजी अबड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चांदवड येथे पदवीव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

फडकेपाडा गावातील ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला. माजी नगरसेवक हिरा पाटील, बाबाजी पाटील, आमदार राजू पाटील, रमाकांत मढवी, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, सुमित भोईर, काळुराम पाटील, दत्तू म्हात्रे, वैभव आलिमकर, चंद्रकांत आलिमकर आदींनी वेदश्रीला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT