Crime News sakal
मुंबई

Crime News: १९९५ मध्ये हत्या, २९ वर्षांनी अटक पोलिसांनी केली अटक

पुढील कारवाईसाठी त्याला सफाळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले |He was handed over to Safale police for further action

CD

Palghar News: आगरवाडी रामबाग येथील एका कंपनीजवळ झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला तब्बल २९ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुजरातमधील पारडी येथून या आरोपीला मंगळवारी (ता. २) अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला सफाळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Maharashtra Crime News)

१९९५ मध्ये आगरवाडी रामबाग येथील एका कंपनीच्या पाठीमागे हरेश पटेल आणि मोहन दुबळी यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. या भांडणात हरेश पटेल याने मोहन दुबळी यांची हत्या केली.(crime news)

पोलिसांनी हरेश पटेल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती; पण २६ एप्रिल १९९५ ला तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. मूळचा आसाम येथील असलेल्या हरेशचा शोध पोलिसांनी तेथे जाऊन घेतला; पण त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.(Palghar Crime News)

आता तब्बल २९ वर्षांनी तो गुजरातमधील पारडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला २ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. शोध पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, राजेश वाघ, पोलिस हवालदार राकेश पाटील यांनी ही कामगिरी केली.(marathi Crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

SCROLL FOR NEXT