मुंबई

रुट मार्चच्या माध्यमातून निर्भय मतदान करण्याचा संदेश

CD

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : लोकसभेच्या निवडणुका, तसेच सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांच्या वतीने शिस्तबद्ध रुट मार्च काढण्यात आला. तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती रुट मार्चदरम्यान पोलिसांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रुट मार्च काढण्यात येत आहे. परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे व पनवेलचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांकडून पनवेल शहरातून करंजाडे वसाहतीत रुट मार्च काढण्यात आला. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते. करंजाडे वसाहतीतील सेक्टर-१ ते ६ पर्यंत पनवेल शहर पोलिसांनी संचलन केले. रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सवानिमित्त पनवेल शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी रुट मार्च काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT