मुंबई

दोस्ती रेंटलमधील ४० गाळे बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : दोस्ती रेंटल सोसायटीतील अस्वच्छतेवरून पालिका प्रशासनाने अस्वच्छता करणाऱ्या रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता येथील ४० गाळे वितरित केले नसल्याने मागील १४ वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे गाळे विकत अथवा भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा वापर होऊन परिसरस्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.

वर्तकनगर येथील दोस्ती रेंटलच्या इमारतीत ठाण्यातील मुंब्रा, कळवा, वागळे, लोकमान्य नगर, घोडबंदर रोड आदींसह शहराच्या विविध भागांतून विस्थापित झालेले कुटुंबे मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. याठिकाणी चार इमारती असून त्याठिकाणी १,४४८ फ्लॅट व तब्बल ४० गाळे आहेत. ते आजतागायत बंद स्थितीत आहेत. वास्तविक पाहता एमएमआरडीएने हे गाळे भाड्याने किंवा विकत देणे अपेक्षित होते; परंतु अद्यापही ते गाळे कोणालाही वाटप केलेले नाहीत.

दोस्ती रेंटल सोसायटीत नेहमीच सुविधांची वानवा असते. लिफ्ट सतत नादुरुस्त असतात, पिण्याच्या पाण्याचा तसेच स्वच्छतेचादेखील अभाव आहे. दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. सीसीटीव्हीचीदेखील तोडफोड केलेली आहे. त्यामुळे येथे चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी येथील रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. पालिकेकडून तात्पुरती स्वच्छता किंवा इतर बाबींकडे लक्ष दिले जाते; मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे येथे सुविधांची वानवा असते. येथील गाळे भाड्याने किंवा विकत दिले तर येथील स्वच्छतेवर चांगला परिणाम दिसून आला असता, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

मागील १४ वर्षांपासून येथील गाळे बंद स्थितीत आहेत. त्या गाळ्यांचे वाटप का झाले नाही, याचे उत्तरदेखील महापालिकेकडे नाही. एमएमआरडीएच्या माध्यमातून या गाळ्यांचे वितरण होणे अपेक्षित असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT