मुंबई

मतभेदामुळे महाविकास आघाडीला यश नाही

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महाविकास आघाडीतील मतभेद पाहता त्यांना लोकसभा निवडणुकीत यश येणार नसल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली. त्यामुळे महायुतीला ४८ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळेल, असेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप बूथ वरचा नारा देत वेगळा विचार घेऊन पुढे येत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला जी मते मिळाली, तेथे अतिरिक्त ३७० मते भाजपला मिळवायची आहेत. ही अतिरिक्त ३७० मते कशी मिळवायची, यासाठी भाजप बूथ व्हिजन अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान ३ ते ९ एप्रिल या कालावधीत राबवले जात आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन भाजपच कार्यकर्ते पत्र देणार आहेत. प्रत्येक घरावर आणि गाडीवर स्टिकर लावण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा लावला जाईल. या काळात जो भाजपचा मतदार नाही, त्यांचेही मन वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिथे महायुतीचा उमेदवार, तिथे त्यांचा प्रचार करणार आहे, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील मतभेद बघता त्यांना यश येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारांची नावे लवकरच
ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवाराबाबत चर्चा करून तोडगा निघेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आपलाच उमेदवार असावा. पण, एकदा निर्णय झाला की, भाजपचे कार्यकर्तेही कामाला लागतील. भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल. आमची मते व मने जुळली असल्याने उमेदवारांची नावे लवकरच बाहेर येतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT