मुंबई

दिवा युवा सेनेच्या अध्यक्षपदी अमर पाटील

CD

दिवा, ता. ४ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातर्फे विविध रिक्त पदांच्या नियुक्त्या केल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहराच्या युवा अध्यक्षपदी माजी नगरसेवक अमर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना विभागल्यानंतर दिव्यातील हे पद रिक्त होते. ते भरून काढत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या निवडीमुळे दिव्यातील अनेक युवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कल्याण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिवसेना (शिंदे गट) गटप्रमुखांची संवाद बैठक नुकतील कल्याण येथील क्लासिक हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर पाटील यांना नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली. यापूर्वी त्यांनी युवा सेनेचे विभाग अधिकारी म्हणून सहा वर्षे काम पाहिले आहे. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक युवकांशी जवळीक साधलेली आहे.
गेली अनेक वर्षे नगरसेवक पद भूषवत असताना रस्ते, पाणी, युवकांसाठी रोजगार मेळावे, गरीब घटकांना शिक्षणासाठी मदत करणे, ठाणे जिल्हा स्तरावर युवकांसाठी विविध उपक्रम राबवणे, जनतेच्या समस्या सोडवणे अशी अनेक कामे त्यांनी पार पाडलेली आहेत. भविष्यात पुढेही असेच दिव्यातील विभागानुसार उपक्रम राबवून दिव्यातील युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे, दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आणि दिवा येतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT