मुंबई

सरकारनामा कोट गृहिणी

CD

-----------
निर्भया घटनेनंतर स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे अंमलात आले. त्यानंतर अजूनही अनेक स्त्रिया अत्याचार तसेच कौटुंबिक तसेच सामूहिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. सरकारने कायदे कडक करावेत. त्याचबरोबर या घटना कशा पद्धतीने रोखता येतील; तसेच यासाठी सामाजिक समुपदेशनसारखे उपक्रम राबविले पाहिजेत, अशी माझी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे.
- अ‍ॅड. विद्या सुतार, शिरवणे गाव

-----------
देशात फोफावत चाललेला जातीयवाद संपवावा, अनैतिक पद्धतीने चाललेले राजकारण थांबवावे, न्यायपालिकेला पूर्णपणे स्वायत्ता मिळावी आणि सरकारने प्रसारमाध्यमांचा वापर प्रबोधनासाठी करावा. सर्वांत महत्त्वाचे या सर्वांनी संविधानाचे पालन करावे. येणाऱ्या सरकारने संविधानाचे रक्षण केले पाहिजे.
- कीर्ती सोरटे, वाशी

-----------
नवीन येणारे सरकार सर्वसामान्यांचा विचार करणारे असावे. सर्व आरोग्य सेवा, शिक्षण संस्था सामान्य जनतेच्या हितासाठी सक्षम करण्यासाठी भर देण्यात यावा. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने विविध उपाययोजनांवर भर देणे अपेक्षित आहे. कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
- गौरी कचरे, सानपाडा

----------
देशात वाढलेली महागाई गृहिणींसाठी शाप ठरत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या आहेत. वाढते वीजबिल, गॅसदर यांनी महिन्याचे बजेट कोसळून जात आहे. शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने उपाययोजना राबवल्या पाहिजेत.
- हेमांगी म्हात्रे, बोनकोडे गाव

----------
महिलांसाठी घरबसल्या, ऑनलाईन नोकऱ्या, उद्योजकतेच्या संधी, आर्थिक पाठबळ इत्यादीद्वारे आधार देण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे. महिलांसाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवली पाहिजे. गेल्या ७० वर्षांत स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे झाले; पण अनेक स्त्रियांना या अधिकारांबाबत जाणीवही नाही. त्या बाबत माहिती पोहचवणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करायला हवी.
- सविता पाटील, नेरूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT