मुंबई

एटीएम फोडण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक

CD

अंधेरी, ता. ४ (बातमीदार) : एटीएम फोडून आतील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जावेद यासीन शेख या आरोपीस वाकोला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलिस कोठडीत आहे. यू-ट्युबवरील व्हिडीओ पाहून त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात एक खासगी बँकेचे एटीएम आहे. तीन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएम मशिन फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने वाकोला पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासात रात्री एक वाजता एक तरुण चेहऱ्यावर मास्क घालून एटीएम सेंटरमध्ये आला होता. त्याच्या हातात एक बॅग होती. त्याने ग्राइंडरच्या मदतीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी जवळपास ऐंशीहून अधिक सीसी टीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीवरून जावेद शेख याला वाकोला येथील धोबीघाट परिसरातून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी ग्राइंडर मशिन, कटर ब्लेड, सिजर कटर, गॅस कॅन, पाईप आदी मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्याने यू-ट्युबवर एटीएम फोडण्याचे काही व्हिडीओ पाहिले होते. ते व्हिडीओ पाहिल्यानंतर तो तिथे चोरीच्या उद्देशाने आला होता. मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT