मुंबई

चोरीप्रकरणी महिलेस अटक

CD

चोरीप्रकरणी महिलेस अटक
अंधेरी, ता. ४ (बातमीदार) ः धार्मिक कार्यक्रमांत चोरी करणाऱ्या हर्षा अनिल वासवानी या महिलेस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. तिला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तक्रारदार महिला मालाड येथे राहते. गेल्या आठवड्यात ती मालाड येथील एका धार्मिक कार्यक्रमात गेली होती. तिथल्‍या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिची पर्स चोरी केली. घरी आल्यानंतर तिला हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. चोरीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजमध्ये हर्षा ही तक्रारदार महिलेची पर्स चोरी करताना दिसून आली. या फुटेजवरून तिची माहिती काढून तिला मालाड येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT