मुंबई

श्वानाला मारल्याचा जाब विचारल्याने चाकूहल्ला

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुलुंडच्या पश्चिमेकडील वैशालीनगर परिसरात रस्त्यावरील भटक्या श्वानाला मारहाण करण्यास मनाई केल्यामुळे दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ३) घडली होती. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दिनेश बोरेचा (वय ६०) याला अटक केली आहे.
कांदिवली परिसरात वास्तव्यास असलेली ५० वर्षीय महिला तिच्या राहत्या इमारतीलगतच्या रस्त्यावर उभी होती. याच वेळी तिथून जाणाऱ्या दिनेश बोरेचा याने रस्त्यावरील भटक्या श्वानाला मारहाण केली. त्यामुळे महिलेने मारहाण थांबवण्यास सांगताना बोरेचा याला जाब विचारला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की बोरेचा याने खिशातील चाकू काढत महिलेवर हल्ला केला होता. यावेळी महिलेच्या बचावासाठी आलेल्या तिच्या नातेवाइकांवरही बोरेचाने चाकूने हल्ला केला. त्यात जखमी असलेल्या दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून पीडित महिला, आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
------------------------------
६ एप्रिलपर्यंत कोठडी
रागीट स्वभावाचा असलेल्या बोरेचा याने अनेकदा हिंसक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी नेहमी चाकूसोबत ठेवत असल्याचे चौकशीदरम्यान त्याने कबूल केले. तसेच आरोपी मानसिक रुग्ण आहे. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT