Mira Bhayander City District President Mohan Patil of NCP Ajit Pawar  sakal
मुंबई

Crime News: फरार असलेल्या अजित पवार गटाच्‍या जिल्हाध्यक्षाला अटक, काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना पोलिसांनी अटक केली |Mira Bhayander City District President Mohan Patil of NCP Ajit Pawar faction was arrested by the police.

CD

Crime News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना पोलिसांनी अटक केली.

अभिनव शेतकरी शिक्षण मंडळातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोहन पाटील गेल्या महिन्याभरापासून फरार होते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी त्यांना अटक केली.

मोहन पाटील हे अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे २०११ ते २०१९ या काळात कार्याध्यक्ष होते. या काळात त्यांनी संस्थेच्या शाळेतील संगणकांची देखभाल दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र व विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली खिचडी यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याप्रकरणी २०१८मध्ये नवघर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. तेव्हापासून पाटील हे फरार होते. शुक्रवारी (ता. ५) सकाळी मोहन पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT