मुंबई

‘बार्टी’च्या संशोधन तज्ञ परिषदेवर रमेश शिंदे यांची निवड

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील संशोधन विभागामार्फत संशोधक तज्ज्ञ व्यक्तीची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून संशोधक आणि दुर्मिळ पुस्तकांचे संग्राहक रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी संस्था महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संदर्भात संशोधन करणारी आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनास अहवालाच्या माध्यमातून धोरणात्मक शिफारशी करणारी संस्था आहे. या संशोधनाच्या कार्यात संस्थेला मार्गदर्शनाची गरज असते. संशोधन प्रस्ताव, संशोधन पद्धती निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पैलूचे निर्देशांक तयार करणे, माहिती संकलनाची साधने आदी महत्त्वाच्या बाबी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तीची संशोधन परिषद नियुक्त करण्यात आलेली आहे. या परिषदेवर रमेश शिंदे यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT