Crime News esakal
मुंबई

Crime News: नवी मुंबई पोलिस आक्रमक; अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल

रबाळे पोलिस ठाण्यात हंसराम चौधरी नावाच्या विकसकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे | A case has been registered against a developer named Hansram Chaudhary in Rabale police station

CD

Vashi News: नवी मुंबई महापालिकेची कोणत्याही प्रकारची बांधकामासाठी पूर्वपरवानगी न घेता बेकायदा आरसीसी बांधकाम केल्याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात हंसराम चौधरी नावाच्या विकसकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या आदेशान्वये व घणसोली विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागाचे अतिक्रमण उपअभियंता रोहित ठाकरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घणसोली, समर्थनगर येथे २२ बाय १६ मीटर जागेवर महापालिकेची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता, अनधिकृतपणे आरसीसी बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत बेकायदा बांधकाम करणाऱ्या हंसराम चौधरी या विकसकास नवी मुंबई महापालिकेतर्फे घणसोली विभाग कार्यालयाकडून २०२३ मध्ये नोटीस बजावली होती.

तसेच हे अनधिकृत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते; मात्र महापालिकेच्या या नोटिशीनंतरही संबंधिताने बांधकाम उभारणीचे काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे घणसोली अतिक्रमण उपअभियंता रोहित ठाकरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT