मुंबई

नागपाड्यात अल्पसंख्याक महिलांमध्ये मतदानसंदर्भात जनजागृती

CD

नागपाड्यात अल्पसंख्याक महिलांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अल्पसंख्याक महिलांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी, तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई शहरात निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत निवडणूक आयोगाकडून नागपाडा भागातील अल्पसंख्याक महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नागपाडा जंक्शन येथील जैनाब टॉवरजवळ रईस वस्ती स्तर संघातील महिला सभासद, तसेच पालिका अभियंता, समाज विकास अधिकारी, समुदाय संघटक यांच्यासमवेत महिला मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली. मतदानाबद्दल अल्पसंख्याक महिलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढावा, त्यांनी स्वतंत्र विचार करून लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करावे, हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि मतदान करणार असल्याची शपथ घेतली. यावेळी महिलांनी आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव मतदार यादीत तपासण्यासाठी व्होटर हेल्पिग ॲपवर अथवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही यावेळी त्यांना आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT