Navi Mumbai police  sakal
मुंबई

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

स्थानिक पोलिसांबरोबरच बंदोबस्तासाठी बाहेरची कुमक मागवली गेली |Along with the local police, an outside force was called for security

CD

Panvel News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली येथे मतदान होत आहे. या नक्षली आणि दुर्गम भागामध्ये मतदानप्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडावी, यासाठी नवी मुंबई पोलिस दलातील तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार आहेत.(navi mumbai crime)

देशामध्ये लोकसभेची सात टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यामध्ये गडचिरोली, चिमूरचा समावेश आहे. अतिदुर्गम अशा या मतदारसंघात मतदान केंद्रे दूर आहेत.(gadchiravli police)

तसेच बराचसा भाग हा नक्षलग्रस्त असल्याने निर्भय वातावरणामध्ये निवडणुका घेणे आव्हानात्मक असते. त्यामुळे स्थानिक पोलिसांबरोबरच बंदोबस्तासाठी बाहेरची कुमक मागवली गेली. नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून शंभर जणांच्या तीन तुकड्या जाणार आहेत.(pavel crime news)

यातील पहिली तुकडी गुरुवारी (ता. ११) गडचिरोलीकडे रवाना झाली असून मुख्यालय, वाहतूक, गुन्हे आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश आहे.


गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यातील इतर भागांतून बंदोबस्तासाठी पोलिसांची फौजफाटा मागवण्यात आला आहे. त्यामध्ये नवी मुंबईतून तीन तुकड्या जाणार आहेत. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काही अधिकारीही गडचिरोलीत तैनात करण्यात येणार आहेत.


- संजय कुमार पाटील, उपायुक्त, पोलिस मुख्यालय, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT