मुंबई

Railway Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वे टॉप; मिळाले तब्बल इतके व्ह्यूज!

रेल्वेमंत्र्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सतत संपर्कात असतात |Everyone from railway minister to high ranking officials are in constant touch with passengers through social media

सकाळ वृत्तसेवा


मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेने सोशल मीडियाच्या वापरात पब्लिक ॲपवर भारतीय रेल्वेतील सर्व विभागांना मागे टाकत अव्‍वल स्थान पटकावले आहे. महिनाभरात सोशल मीडियावरील २९ व्‍हिडीओंना ९१ लाख ३१ हजार ३९३ व्ह्यूव मिळाले आहेत.


भारतीय रेल्वे सोशल मीडियाचा अत्यंत कुशलतेने वापर करत आहे. रेल्वेमंत्र्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सतत संपर्कात असतात. कोट्यवधी रेल्वे प्रवाशांशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या तक्रारी, सूचना ऐकून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रेल्वे आणि प्रवाशांमध्ये सोशल कनेक्ट तयार होण्यास मदत झाली आहे.

तसेच, भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांकडून सोशल मीडियावर प्रवाशांना सूचना देणारे व्हिडीओही शेअर केले जातात. पब्लिक नावाच्या ॲपवर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पाहिले जात असून महिनाभरात मध्य रेल्वेच्या २९ व्हिडीओंना ९१ लाख ३१ हजार ३९३ व्ह्यूव मिळाले आहेत.

या यादीत कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मेट्रो, रेलटेल आणि इतर एकूण ३४ विभाग आहेत. त्यांचेही पब्लिक ॲपवर व्हिडीओ आणि व्ह्यूवची संख्या देण्यात आली आहे.

एक्स अकाऊंटही सुसाट


मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरणही केले जाते. याबाबत अधिकारीच उत्तर देतात. यामुळे रेल्वेच्या कामात मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर ५७१ हजार फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT