Bhiwandi Loksabha congress sakal
मुंबई

Bhiwandi Loksabha: भिवंडीवर काँग्रेसचा दावा कायम; पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा अशी घेतली भुमिका

भिवंडी मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तयार नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे |It has once again come to light that the local office bearers of the Congress are not ready to leave the Bhiwandi constituency

सकाळ वृत्तसेवा

Thane News: महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे गेलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांचे सर्वेक्षण करून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे.

त्यामुळे भिवंडी मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तयार नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू असलेला महाविकास आघाडीचा तिढा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा यांच्या उमेदवारीने सुटला आहे. जागावाटपातही त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मात्र ही जागा ‘हात’ची गेल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवार असलेले दयानंद चोरघे यांच्या ही बाब जिव्हारी लागली आहे. पक्षश्रेष्ठीने या जागेवरून समजूत काढल्यानंतरही मागे हटण्यास तयार नसून अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

याच अनुषंगाने गुरुवारी चोरघे यांच्या निवासस्थानी ग्रामीण ठाणे जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पक्षश्रेष्ठींवर दबाब आणण्याचा शेवटचा प्रयत्न केला गेला आहे. या वेळी भिवंडीत पहिल्या क्रमांकाची मते शिवसेनेची आहेत; तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असल्याचा दावा चोरघे यांनी केला.

तसेच शहापूर, मुरबाडमध्ये ताकद नसताना कोणत्या आधारावर ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडली, असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीचा उमेदवार असलेल्या सुरेश ऊर्फ बाळ्यामामा यांना मतदारसंघात कोणीही ओळखत नसल्याचा टोलाही लगावला आहे.


राजकारणात भाऊबंदकी नसते


दयानंद चोरघे आपले छोटे भाऊ आहेत. त्यांचा राग आपण शांत करू, असे सुरेश म्हात्रे म्हणाले होते. चोरघे यांनीही ते आपले मोठे भाऊ आहेत; पण हे राजकारण आहे. येथे छोटा-मोठा भाऊ हे बाजूला ठेऊन काम करायचे असते, असा टोला लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT