Prakash Ambedkar Sakal
मुंबई

Maval Lok Sabha: वंचित मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार, स्‍थानिकांना मिळणार प्राधान्य

पक्षाकडून चाचपणी सुरू; स्‍थानिकांना मिळणार प्राधान्य

CD

कामोठे, ता. १६ (बातमीदार) : आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्‍यासाठी पक्षाकडून चाचपणी करण्यात येत आहे. येथील स्‍थानिक आगरी, कोळी समाजातील उमेदवाराला प्राधान्य मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

२००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी- चिंचवड तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या विधानसभा मतदारसंघाचा मावळमध्ये समावेश झाला आहे. २००९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उरण तालुक्यातील आगरी, कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांना या निवडणुकीत ७५,९०४ मते पडली होती. त्यांना संपूर्ण मतदानाच्या एकूण ५.५४ टक्के मतदान झाले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण व कर्जत या विधानसभा मतदारसंघात आगरी- कोळी समाजाचे प्राबल्य आहे.

राजाराम पाटील यांना पडलेली मते लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आगरी, कोळी समाजाचा उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर मावळसाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीचे नाव सध्या चर्चेत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाटाघाटी जागा वाटपावरून फिसकटली आहे. वंचित बहुजन आघाडीने दलित आणि बहुजनांचे वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनामुळे भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीने रायगड लोकसभा मतदारसंघात ताकदीचा उमेदवार दिला आहे. त्याप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
- रेखा ठाकूर, प्रदेश अध्यक्षा, वंचित बहुजन आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT