मुंबई

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून वाढदिवशीच मैत्रिणीची हत्‍या,कांदिवलीतील घटना; आरोपीला अटक

हेमकुमारीचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती डंबरच्या घरी आली आणि तिचा हा शेवटचा वाढदिवस ठरला

CD

अंधेरी, ता. १६ (बातमीदार) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हेमकुमारी मोतीराम भट या तरुणीची तिच्याच मित्राने मारहाण करून हत्या केल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. डंबर बहादूर विश्‍वकर्मा या आरोपी मित्राला समतानगर पोलिसांनी अटक केली असून त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेमकुमारीचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती डंबरच्या घरी आली आणि तिचा हा शेवटचा वाढदिवस ठरला. डंबर आणि हेमकुमारी हे दोघेही नेपाळचे रहिवासी आहेत. डंबर हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तर हेमकुमारी ही पेशंटची देखभाल करण्याचे काम करत होती.

काही महिन्यांपूर्वीच ती नेपाळहून नोकरीसाठी मुंबईत आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिची फेसबुकवरून त्याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती आली असता आरोपीची आईही तिथे होती.

दोघांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर मद्यप्राशन केले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यातून त्याने तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यात ती बेशुद्ध झाली होती. तिला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : E20 इंधनाच्या मुद्द्यावर लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा यासाठी आम्ही आज एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी करत आहोत - केजरीवाल

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT