Mumbai Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime News: टेम्पोमधून प्रवास करतांना तीन बांगलादेशी नागरीकांना अटक

CD

Navi Mumbai News: महापे-शिळफाटा रोडने टेम्पोमधून जाणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी टेम्पोही जप्त केला. अटक करण्यात आलेले तिघे बांगलादेशी नागरिक पालघर येथे मासेमारी व इतर कामे करून मागील काही वर्षापासून बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

महापे चेकपोस्ट येथून काही बांगलादेशी नागरिक शिळफाटा बाजूकडे जाणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश येवले व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री महापे शिळफाटा रोडवर महापे चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली होती.

रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास संशयित टेम्पोची तपासणी केली असता, पोलिसांना टेम्पोत जाईल साबुद्दीन सरदार (वय ३४), अल्लाउद्दीन रज्जाक शेख (वय ४५) व अल्लाउद्दीन सुकथन मंडल (व ५३) हे तिघे बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी बांगलादेशातील गरिबीला कंटाळून अवैधरीत्या भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT