navi mumbai crime sakal
मुंबई

Navi Mumbai : हॉटेलमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई

या प्रकरणी सनशाईन हॉटेलचे मालक नवीनकुमार पुजारी, व्यवस्थापक सुभाष जाधव, एका गिऱ्हाईकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CD

Tarapur Crime: एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

तारापूर एमआयडीसीमधील कॅम्लिन नाका परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. १६) वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी अधिकारी अनिल विभुते यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये एक बोगस गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची पडताळणी केली असता तथ्य असल्याचे आढळून आले.

स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिस कर्मचारी यांचे पथक तयार करून हॉटेलवर धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सनशाईन हॉटेलचे मालक नवीनकुमार पुजारी, व्यवस्थापक सुभाष जाधव, एका गिऱ्हाईकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील नलावडे, हवालदार संदीप सूर्यवंशी, कैलास पाटील, नरेंद्र पाटील बोईसर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी पल्लवी कोल्हे, पूजा सुतार यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT