Mumbai News: Relief for Kishori Pednekar; The High Court granted pre-arrest bail! sakal
मुंबई

Mumbai News: किशोरी पेडणेकरांना दिलासा; उच्च न्यायालयाने दिला अटकपूर्व जामीन!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कोविड काळात शवपिशवी (बॅग) खरेदी गैरव्यवहारात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला.

कथित घोटाळ्यात अटक करण्याएवढे पुरावे नाहीत, असे स्पष्ट करत न्या. निजामुद्दीन जमादार यांनी पेडणेकर यांना तीस हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

कोरोना काळात शवपिशवीची जादा दराने खरेदी करत वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसी कलम ४२० (फसवणूक), १२० (ब) (गुन्हेगारी कट रचने) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी अॅड. राहुल आरोटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, तपास यंत्रणांनी दिलेल्या मुदतीत पुरावे सादर केले नसल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT