Thane sakal
मुंबई

Thane: रॅकेट चालविणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक

CD

Thane News: कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आणि गुन्हा दाखल होताच फरारी होणाऱ्या दलाल प्रवीण दास (३४, रा. कोळीगाव, डोंबिवली) याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचत शुक्रवारी (ता. १९) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक केली. (maharahtra news)

प्रवीण दास याला कासारवडवली पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी दिली. दास हा मागील तीन वर्षांपासून फरारी होता. त्यापूर्वी त्याच्यावर सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी पिटा कायद्यानुसार कारवाई करत त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान, त्यानंतरही आरोपीने कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्स रॅकेट चालविण्यास सुरुवात केली. याची माहिती पोलिसांना मिळताच केलेल्या छापेमारीत प्रवीण दास हा फरारी झाला होता.

त्याच्या विरोधात २०२१ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून प्रवीण दास हा डोंबिवली येथे असल्याचे लक्षात येताच पथकाने शुक्रवारी पहाटे त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT