Mumbai Local Crime sakal
मुंबई

Mumbai Local Crime: लोकलमधील प्रवाशाकडून मद्याचा साठा जप्त; पोलिसांची मोठी करवाई

सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यातच कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तपासणीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. नथुराम तांबोळी असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आगामी निवडणुकीदरम्यान कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी पोलिस घेत आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी संशयास्पद वस्तूंसह संशयितांची तपासणी केली जात आहे. सोबतच रेल्वेस्थानक आणि परिसरासह लोकलमधून प्रवास करणाऱ्या संशयितांची तपासणी केली जात आहे. सीएसएमटी-टिटवाळा लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी पोलिस पेट्रोलिंग करत असताना शहाड ते टिटवाळा रेल्वेस्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातात संशयास्पद बॅग आढळून आली होती

यावेळी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी त्याला टिटवाळा स्थानकावर ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता बॅगेत देशी आणि विदेशी मद्याच्या २०० बाटल्या आढळून आल्या. हा मद्यसाठा शहाड येथील एका व्यक्तीच्या दुकानातून घेतला असल्याची माहिती त्याने दिली.

यामध्ये नथुराम तांबोळी असे दारूच्या साठ्यासह ताब्यात घेतल्याचे नाव असून तो खडवली परिसरात राहणारा आहे. या प्रकरणाचा लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT