Mumbai News: sakal
मुंबई

Mumbai News: अनोळखी व्यक्तीचा आला फोन अन् पोलिस आले अलर्टमोडवर; जाणून घ्या नक्की काय झाले

सकाळ वृत्तसेवा


Mumbai Police News: अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड दादर रेल्वे स्थानकात येणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला होता. शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या निनावी कॉलमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोडवर गेली होती.


मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या शुक्रवारी मध्यरात्री एक अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड दादर रेल्वे स्थानकात सकाळी दहा वाजता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.(mumbai crime latetest News)

तसेच मुंबईत तो घातपात करणार असल्याचेही कॉल करणाऱ्याने सांगितले. हे बोलून त्याने तातडीने कॉल कट केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याने मोबाइल बंद केला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दादर रेल्वे पोलिस, दादर पोलिस, शिवाजी पार्क पोलिस, भोईवाडा पोलिस यांना दूरध्वनीबाबतची माहिती देऊन सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली; पण तपासणीत तसे काहीही आढळले नाही. (mumbai marathi news )

मस्करी तरुणाला भोवली


सलमानच्या घराजवळ लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २० वर्षीय तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. रोहित त्यागी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी आहे. (crime marathi news)

त्याने गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथून वांद्रे येथे जाण्यासाठी खासगी टॅक्सीची नोंदणी केली होती. याप्रकरणी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून केवळ मस्करीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे चौकशीत सांगितले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT