मुंबई

Mumbai News: मुंबईजवळ या ठिकाणी होत आहे बिबट्याचा वावर; परिसरात भितीचे वातावरण

गेल्या वर्षी मार्चमध्येही या भागात बिबट्याचा वावर होता. त्यावेळी स्थानिकाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता.

CD

Mumbai News: भाईंदरजवळील उत्तन परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. केशवसृष्टी परिसरातील एका घराबाहेर लावलेल्या सीसी टीव्हीत बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्येही या भागात बिबट्याचा वावर होता. त्यावेळी स्थानिकाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता.

उत्तन येथील केशवसृष्टी परिसरात बिवट्याचा वावर असल्याचा संशय स्थानिकांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून येत होता. त्यातच या भागात राहणारे डॉमनिक नुनीस यांच्या घराच्या मागील भागात असलेल्या कोंबड्या गायब झाल्याने त्यांचा संशय बळावला. याठिकाणी घराबाहेर त्यांनी सीसी टीव्ही बसवला आहे. परंतु तो बंद होता. त्यांनी तातडीने सीसी टीव्ही दुरुस्त करून घेतला. त्यात रविवारी (ता. २१) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबट्या कैद झाला. नुनीस यांच्या घराच्या मागे असलेली कोंबडी पकडून नेत असताना बिबट्या सीसी टीव्हीत दिसून आला. स्थानिकांनी त्याची माहिती वनविभागाला दिली.

दरम्यान, गेल्या वर्षीदेखील मार्चमध्ये उत्तन येथील पालखाडी, कोपरा या भागात बिबट्या वावरत होता. त्याठिकाणी त्याच्या पावलाचे ठसे दिसून आले होते व परिसरातील कुत्रे, कोंबड्या नाहीशा होत होत्या. भीतीपोटी स्थानिक रहिवाशाने लावलेल्या पिंजऱ्यात त्यावेळी बिबट्या अडकला होता. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले होते. आता पुन्हा या भागात बिबट्याचे दर्शन झाले असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वनविभागाने परिसरात तीन ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्यानंतर त्याचा वावर समजून येणार आहे. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे बसविण्यात येतील, तोपर्यंत परिसरातील रहिवाशांना काय दक्षता घ्यायची, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- राकेश भोईर,
वनक्षेत्रपाल, वन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT