मुंबई

Crime News: बोगस सोने देऊन बँकेला ३८ लाखांना गंडा; वाचा नक्की काय घडल

CD

Mumbai Crime: बोगस सोने देऊन एका खासगी बँकेला सुमारे ३९ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी बँकेच्या व्हॅल्युअर महिलेसह सहा जणांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

त्यात सपना भट, शमी अनिल खत्री, जयनेंद्र जाधव, रफत शमी खत्री, यश जय पारेख आणि पारेख जलपाबेन यश याचा समावेश आहे. याआधी सपना हिला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती.(crime news navi mumbai)

यातील तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून ते मालाडच्या एका खासगी बँकेत व्‍यवस्थापक म्हणून काम करतात. ऑगस्ट ते नोव्हेबर २०२१ या कालावधीत त्यांच्या बँकेत पाच जणांनी गोल्ड लोनसाठी अर्ज केला होता. त्यांना सोने तारण ठेवून ३९ लाखांचे कर्ज दिले होते.
कर्जाची रक्कम त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.

या वेळी सपना भट हिने बँक व्हॅल्युअर म्हणून काम पाहिले होते. मात्र, गोल्ड लोन दिल्यानंतर त्यांनी एकही हप्ता जमा केला नव्हता. त्यामुळे या सर्वांना बँकेतून नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीसला त्यांनी कुठलेही उत्तर दिले नव्हते.(vashi crime news)

त्यामुळे बँकेने त्यांच्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांची फेरमूल्याकंन गरजेचे होते. त्यावेळी तपासणी केली असता सोने बनावट असल्याचे उघड झाले होते. सपना भट हिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास सांगून बँकेची फसवणूक केली होती.(vashi crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT