Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: तीन वर्षापासून न्यायालयात आलेच नाहीत, दोघांना पोलिसांनी केले कैद!

न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे | The court rejected his bail application and sent him to Taloja Jail

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मागील तीन वर्षे न्यायालयात सुनावणीसाठी हजर न राहणाऱ्या दोन आरोपींना नेरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे.

हमीद मोहम्मद शेख (२५) आणि रोहित सुभाष सिंग (२५) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे.

या प्रकरणातील आरोपी हमीद मोहम्मद शेख व रोहित सुभाष सिंग या सराईत गुन्हेगारांनी २०१९ मध्ये आपल्या एका मित्राची हत्या केली होती. तर दुसऱ्याला जबर दुखापत करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नेरूळ पोलिसांनी हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हमीद शेख व रोहित सिंग या दोघांना अटक केली होती.

त्यावेळी हे आरोपी न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर आले होते. मात्र, त्यानंतर ते खटल्याच्या सुनावणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून बेलापूर येथील सत्र न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे बेलापूर सत्र न्यायालयाने या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

त्या अनुषंगाने नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय कांगणे, भानूदास ठाकूर व रशिद पटवेकर यांच्या पथकाने हमीद शेख याला करावेगाव येथून तर रोहित सिंग याला नेरूळ दरावे भागातून ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT