मुंबई

Mumbai Crime: गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; वाचा नक्की कशी झाली कारवाई

CD



Mumbai Crime: गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणाऱ्या रामावतार रामधन मीना (२६) या आरोपीस धारावी पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
तक्रारदार महिला ही धारावीत राहते.

मार्च महिन्यात तिला सोशल मीडियावर शेअर मार्केट ट्रेडिंगसंदर्भात एक जाहिरात दिसली होती. त्यात शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परवाता देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने तिथे संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तिला एका कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला.

चांगला परवाता मिळेल, असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आमिषाला बळी पडून तिने क्यूआर कोड स्कॅन करून एक लाख तेरा हजार रुपये पाठवून दिले होते. मात्र, गुंतवणुकीवर तिला कुठलाही परतावा मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने धारावी पोलिसात तक्रार केली होती.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांच्या पथकातील विकास भारमल, सागर खाडे, पांडेय, कुंभार, पवार यांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीवरून या पथकाने राजस्थान येथून रामावतार मीना याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला होता.

त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, दोन सिमकार्ड आणि बँकेचे दोन पासबुक जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : बिहटा स्थानकाजवळ गाडी क्रमांक २२३४५ वर दगडफेक झाल्याची घटना घडली

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT