मुंबई

मुलुंड पूर्वेत वाहतूक आणि पार्किंग समस्या

CD

मुलुंड पूर्वेत वाहतूक आणि पार्किंग समस्या
- वाहनचालक त्रस्‍त; नियोजनाचा अभाव
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) : मुलुंड पूर्वेतील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्‍येने वाहनचालक त्रस्‍त झाले आहेत. वाहतूक पोलिस, पालिका प्रशासनाने योग्‍य नियोजन करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी मुलुंडकर करत आहेत.
मुलुंड पूर्वेतील नवघर येथील कॅम्पस हॉटेलजवळ दररोज सकाळी, संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. परिणामी, लहान मुलांना, महिलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील वाहनचालक, स्‍थानिक रहिवासी कंटाळले आहेत. त्यातच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनेक दुचाकीस्वार वाऱ्याच्या वेगाने या मार्गावरून जातात. रस्ता ओलांडताना एखाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो. यावर संबधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक व्यक्त करत आहेत.
वाहतूक पोलिस दररोज नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसतात. तरीदेखील बेशिस्तपणे वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. बहुतांश रस्त्यवर दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रासपणे अनधिकृतपणे उभी केली जात आहेत. परिणामी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहेत, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
कॅम्पस हॉटेल जंक्शनजवळ सर्व दिशेतून गाड्या वेगाने येतात. परिणामी, या ठिकाणी छोटे-मोठे अपघातदेखील घडले आहेत. मुलुंड पूर्वेतील हा प्रमुख रस्ता असून या मार्गावरून मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. मुलुंड पूर्वेतील रेल्‍वे स्‍थानक रोडपासून रुची हॉटेल, हनुमान चौक असे मार्गक्रमण केल्यावर कॅम्पस हॉटेल जंक्शन लागते. या ठिकाणी एक रस्ता साने गुरुजी नगर तर, दुसरा रस्ता गव्हाण पाडा, तिसरा रस्ता मुलुंड रेल्वे स्थानकाकडे जातो. तर विरुद्ध दिशेचा रस्ता मुंबई आणि ठाण्याच्या पूर्व द्रुतगती मार्गाकडे जातो. याशिवाय टाटा कॉलनी, दीनदयाळ नगर या ठिकाणीदेखील सतत वाहतूक सुरू असते. परिणामी, जंक्शनजवळ वाहतूक कोंडी होते. चाकरमान्यांना सकाळी कार्यालयाला आणि संध्याकाळी घरी पोहोचायला उशीर होतो.
हनुमान चौक येथे श्री हनुमानाचे देवस्थान आहे. इथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.

पार्किंगची सोय नसल्यामुळे मुलुंडमध्ये वाहतुकीची समस्‍या सतावत आहे. मुलुंड पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग काही महिन्यांपासून बंद आहे. पार्किंगची व्यवस्‍था करावी, यासाठी पालिकेच्या टी विभागाला पत्र दिले आहे. जेणेकरून रस्त्यावरील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल.
-संपत लोंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT