मुंबई

Mumbai News: गीता जैन, नितेश राणे यांच्यावर दाखल झाला गुन्हाच वाचा नक्की काय घडलं

CD

Mira Bhayander: जानेवारीमध्ये मिरा रोड येथे झालेल्या धार्मिक तणावादरम्यान प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी मिरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (ता. २३) ही माहिती दिली.

जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या आदल्या दिवशी मिरा रोडच्या नयानगर भागात धार्मिक तेढ निर्माण झाली होती. त्यात काही जणांना मारहाणदेखील झाली होती. पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केली. (mumbai crime News)

त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे जखमींची विचारपूस करण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये आले होते. त्यावेळी आमदार गीता जैन यादेखील त्यांच्यासमवेत होत्या. यादरम्यान नितेश राणे आणि गीता जैन या दोघांनीही धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.(bjp mla nilesh rane)

याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे आणि गीता जैन यांची भाषणे असलेल्या चित्रफिती तपासण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले होते. ही भाषणे तपासल्यानंतर दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून दोघांवरही धार्मिक तेढ वाढविणारी भाषणे केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.

तेलंगणामधील आमदारावरही गुन्हा


फेब्रुवारीत शिवजयंतीनिमित्त भाजपचे तेलंगणामधील आमदार टी. राजा यांनी मिरा-भाईंदरमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते. सुरुवातीला पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मंजुरी मिळवली होती. या मिरवणुकीतही गीता जैन सहभागी झाल्या होत्या व त्यावेळीही त्यांनी धार्मिक तेढ वाढवणारे भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात टी. राजा यांच्यावर पोलिसांनी याआधीच गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले ते कळणार; नवीन अॅपमुळे काम सोप होणार, प्रक्रिया काय?

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये चाललंय तरी काय? उस्मान हादीनंतर शेख हसीनांच्या आणखी एका कट्ट्रर विरोधकावर हल्ला; भर प्रचारसभेत झाडल्या गोळ्या

India-New Zealand FTA : भारत–न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार! 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक; कृषीसह या क्षेत्रांना होणार फायदा

Mumbai News: संसर्ग नियंत्रणासाठी प्रयोग! पालिका रुग्णालयांत ‘सूक्ष्मजंतूनाशक बेड मॅट’ वापरण्याबाबत चर्चा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले, भाजप पक्ष एक नंबर ठरला - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT